Friday, January 14, 2011

puneri paatya...



पुणे आणि पुणेरी पाट्या यांचे नाते नवरा बायको ( आपल्या generation मधले नव्हे ) यांच्या नात्याप्रमाने अतूट आहे. आजकाल तर पुणेरी लोकांपेक्षा बाहेरचे लोकच या पाटयांमध्ये जास्त interest घेतात.
 पुणे जस शिक्षण, संस्कृती, परंपरा या गोष्टींसाठीतर पूर्वीपासून फेमस आहे. पण काही वर्षांपासून पुणे अजून एक गोष्टीसाठी ओलखले जाऊ लागले. नाव वेगले सांगायला नको. ते म्हणजे पाट्या. आमच्यासारखे nonpunekar त्याला 'पुणेरी पाट्या' अस म्हणतो. आम्हा लोकाना या पाट्या म्हणजे एक गंमत आणि पाटी लावणार्यांचा मुर्खपणा वाटतो.
मला मात्र आशा पाट्या पाहून फार मजा वाटते. कधी कधी मी सुद्धा पाटयांसाठी काही lines लिहितो. नुकताच  झालेला 'कांद्याचा वांदा' पाहून एका typical पुणेरी होटेल मध्ये लावण्यासाठी १ लाइन सुचली. ती अशी....

               'आमच्या येथे मिळणाऱ्या onion उत्तपा' मधे कांदा टाकला जातो.'
                                   किंवा
    'शहाणे लोक कांदा होटेलमधे खात नाहीत. तरी कांदा मागून आपला वेडेपणा दाखवू नये.'

     


तर हे अस आहे.. नुकताच एका पुण्यातल्या मित्राचा mail आला. विषय तोच.... पाट्या.. पुण्याविषयीच्या अत्यंत फ़ालतूतल्या फ़ालतू गोष्टीसाठी पण अभिमान बाळगणे यात त्याला फार मोठा तीर मारल्यासारखे वाटते. असो... असतात एक एक नमूने.... तर त्याच्या mail मध्ये   पुणेरी पाट्या’ संस्कृतीचे आक्रमण 'मॅकडोनाल्ड्सवर झाले तर
हा  विषय होता. पाट्या बनवण्यामध्ये हे लोक कुठल्या level वर जाऊ शकतील त्याच हे perfect example आहे. ..वाचा....

१. आमचे येथे बाहेरील खाद्य पदार्थांस एक रुपयात सॉस लावून मिळेल.      
२.दोन माणसात तोंड पुसायचे तीन कागद मिळतील. नंतर ज्यादा आकार पडेल. 
३.टिव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे. तरी बंद टिव्हीचा आरशासारखा उपयोग करून केस वगैरे विंचरू नयेत. 
४. टिव्ही चालू असेल तरी फार पहात बसू नये. हे खाद्यगृह आहेप्रेक्षागृह नव्हे. 
५. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही.
    (लहान साईज: १९ फ्राईजमध्यम : २७ फ्राईजमोठा: ४६ फ्राईज) 
६.
गि-हाईकांचा संतोष हेच आमचे ध्येय. (व्यवसायाच्या वेळा : ११ ते १ व ४ ते ८. तक्रारीची वेळ : ११ ते ११.०५) 
७.
पहिल्या दहा मिंटात ऑर्डर मिळाली नाही तर.. पुढच्या दहा मिंटात मिळेल ! पैसे परत मिळणार नाहीत. 
८.
कृपया ड्राईव थ्रू च्या खिडकीवरील मुलीशी गप्पा मारू नयेत. 
९.
विनाकारण सॉस मागू नये. टमाटू फुकट येत नाहीत. 
१०.
शीतपेयाच्या ग्लासच्या झाकणास भोक पडलेले नाही तर चोखनळी (स्ट्रॉ) साठी पाडलेले आहे. बदलून मिळणार नाही ह्याची नोंद घ्यावी  
११. दुस-या कंपनीच्या बरगरच्या किमती इथे सांगू नयेत. 
१२.
उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लास्टिक पिशवी मिळणार नाही. 
१३.
"हॅपी मिलची खेळणी संपलेली आहेत (ही पाटी कायमची का आहे ते विचारू नये) 
१४.
आमची इतरत्र शाखा आहेतपण दुस-या शाखेच्या तक्रारी इथे सांगू नयेत 
१५.
कृपया बाहेरील आमच्या जोकरच्या पुतळ्याशी फार लगट करू नये. सभ्यपणे फोटो काढावेत.शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा.   
१६.
चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. 

बर झालं की मेक्डोनाल्ड कुठल्या जोशी किंवा आपटे या सारख्या लोकांनी नाही सुरु केलं. नाही तर या पाट्या लागल्याच असत्या कोथरुड किंवा J M रोड वरच्या मेक्डोनाल्ड़ मध्ये.


AMBAVANE's
 

1 comment:

  1. zala tar mag ata pakka puneri.. kharatar puneri patyanna naav thevanya sarkha kahihi naie.. he jo paryant punyat jaun baghat nahi toparyant te patanaar nahi. kaarn punyach puneripan he punyatach. he sagla ya sathi vatatay ki ain aayushyachya valanaavar 2 varshe punyat ghalavnyacha prasang ala ani tya nantar kay saglech badalale. aso.. chhan ahe blog lihita tumhi.. shubhechchha..

    ReplyDelete