नमस्कार......
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...........
खालील कविता आपल्यासारख्या young citizens चे विचार correct शब्दात व्यक्त करते. मला ही कविता फार आवडली.. म्हणून वाटले share करावी आपल्यासोबत..... पाहुयात आपल्या स्वतःला या कवितेशी relate करता येते का...............
देवावर श्रद्धा ठेवतो मी, अंधश्रद्धेवरही बडबडतो मी,
पुरणपोळी चापतो मी, तंगडीदेखील तोडतो मी.
हिंदी सिनेमे पाहतो मी, विंग्रजीसुद्धा झाडतो मी,
'मात्रुभाषेला ' मात्र तोड नाही एवढेच फक्त मानतो मी.
शिव्या सुद्धा देतो मी, कविता देखील करतो मी,
कधी कुणालाही हरवतो मी, कधी जिंकता जिंकता हरतो मी.
अध्यात्मावर बोलतो मी, फ्लर्टिंगसुद्धा करतो मी,
मी मी करतो मी, कधी सेल्फलेस देखील होतो मी.
प्रेम करत नाही कुणी म्हणून डिप्रेस्स सुद्धा होतो मी,
स्वःतालाच समजावतो मग, "नाही रे, त्यांच्याच नशिबात नाही मी!"
कधी देवाशी बोलतो मी, कधी मौनाला धरतो मी,
जिवलग एखादा चुकलाच तर लेक्चर सुद्धा झाडतो मी.
प्रश्न सगळ्या जगाचे सोडवायला, नेहमीच असतो उत्सुक मी,
स्वःताचे प्रश्न सोयीने मात्र, अनुत्तरीतच ठेवतो मी.
" आपलं आयुष्य वेगळं, आपली दुःख वेगळी!"
नेहमी स्वःताच्याच कक्षेत फिरतो मी.....
सभोवती मात्र जेव्हा, असहाय्य दीन पाहतो मी,
ख्ररच, स्वःताला खूप भाग्यवंत समजतो मी.............
I don't know who is creator of this masterpiece. but whoever has written it, must be a genius. Hats off to him.
AMBAVANE's
This comment has been removed by the author.
ReplyDeletekhup ch chhan kavita!
ReplyDeletethanks for sharing :)